Posts

Showing posts from June, 2025

पाठवणी

👍👍🙏🙏पाठवणीच्या वेळी नववधूने  प लग्नाला दिला नकार!!!  (ही गोष्ट तुम्हाला अंतर्मुख करेल) लग्न९o पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता. नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली, मग ती.आपल्या वडि लांच्या कुशीत शिरली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती. नवरदेव अविनाश आपला मित्र विकाससोबत गप्पा मारत होता. विकास म्हणाला, "यार अविनाश, एक काम कर… घरी पोचताक्षणी 'अमृतबाग' हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू… इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही जेवणात." तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हटला, " पनीरची भाजी पण काही खास नव्हती…आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पांचट जेवण होते रे " आणि मोठ्याने हसायला लागला. अविनाशही हसत म्हणाला – "जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा… इथे काही चवच नव्हती… पुऱ्यापण गरम नव्हत्या." मामा व मावस भाऊ, मावस बहिणी  म्हणाल्या की आपण झोमॅटो वरून काहीतरी इथे चटपट मागून घेऊ.  हे सगळं ऐकून, नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली, डोईवरचा पदर काढून कंबरेला खोवत तडक वडिल...