Posts

Showing posts from June, 2026

TET

*TET:*           *कागदावरची 'पात्रता' आणि वर्गातली 'माणुसकी'* कागदावरचे गोल काळे करताना आयुष्याचे रंग विसरलो होतो... मार्कशीटवर 'पास' झालो, पण कोवळ्या डोळ्यांतले प्रश्न वाचायला हरलो होतो! रात्रीचे दोन वाजले आहेत. घराच्या एका कोपऱ्यात डिम लाईट सुरू आहे. डोळ्यांवर जळजळ आहे, पण समोर बालमानसशास्त्राचे आणि इंग्रजी व्याकरणाचे जाडजूड पुस्तक उघडे आहे. TET ची टांगती तलवार आणि भविष्याची चिंता उराशी बाळगून, सर्व शिक्षक या आठवड्यात रात्र जागवत आहेत. त्यांना फक्त एकच ध्यास आहे — 'TET' (शिक्षक पात्रता परीक्षा) पास होणे. त्यांना माहीत आहे की, जोपर्यंत  या परीक्षेच्या अग्निदिव्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत  हाती 'पात्रतेचे' प्रमाणपत्र येणार नाही.  रात्रभर 'कोहलबर्ग'चे नैतिक विकासाचे सिद्धांत, 'पियाजे'ची बोधनात्मक अवस्था आणि व्याकरणाचे न संपणारे नियम पाठांतर करतोय. पण खिडकीबाहेरच्या शांत अंधारात एक प्रश्न दडलेला आहे, जो त्याला अस्वस्थ करतोय: "खरंच, एका शिक्षकाची माणुसकी, त्याचे धैर्य आणि त्याचे संस्कार चार पर्यायांच्या गोलात मावू शकतात का?...