Posts

Showing posts from December, 2024

शिकार

*शिकार*       परवा एक चित्र पाहण्यात आलं. एका चित्त्यानं एका माकडीणीची केलेली शिकार आणि तरीही तिच्या पोटाला बिलगून बसलेलं तिचं लेकरू तेही जिवंत......      शिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडीण. नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी.  त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक, की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि  तितक्याच अनामिक भावनेनं ते आईला बिलगून बसलं आहे. त्याला माहीत पण नसेल पुढचा नंबर आपला आहे.       त्या आईचं हृदय किती हेलावून गेलं असेल. तीला तिच्या मृत्यूची पर्वा नसेलही कदाचीत, पण तिच्या पोटाशी बिलगून बसलेल्या तिच्या लेकराबद्दल तीला किती असंख्य वेदना झाल्या असतील. मरताना शेवटच्या क्षणाला ही तीला हेच वाटत असनार माझं पिल्लू कसं असेल, ते सुटेल का त्याच्या तावडीतून. शेवटी आईचं हृदयच ...

प्रसाद

🙏🩷🌹🚩🕉️🙏 *🕉️🌹*प्रसाद.*🌹🕉️*                                 *एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. *गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते.  *“फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला. *देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला.  *मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! *गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. ...

भूत आणि गाढव

भूत आणि गाढव. घटनाक्रम लक्षात घ्या... एका कुंभाराने आपले *गाढव* दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका *भूताने* दोरी कापून गाढवाला मोकळे केले.  त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले.  हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले.  गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला.  प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली.  बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं.  कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.  हे पाहून क्रोधीत झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले...  शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, "तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस ??" त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले... "मी कुणालाही ठार केले नाही, *मी फक्त 'दोरीने बां...

शिक्षकांचा पगार

 *शिक्षकाचा पगार* *पिकासो* (Picasso) हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्ज अख्ख्या जगात कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांना विकल्या जात असत! एक दिवस रस्त्यानं जात असता, एका महिलेची नजर *पिकासोकडे* गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ? पिकासो हसत म्हणाला, "मी इथं रिकाम्या हातानं आलोय. माझ्यापाशी कांहीही साधनं नाहीत. मी पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी एक पेंटिंग नक्की बनवून देईन."  परंतू त्या महिलेनं आता हट्टच धरला. ती म्हणाली, "मला आत्ताच एक पेंटिंग बनवून द्या. पुन्हा कधी आपली भेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही." पिकासोनं मग आपल्या खिशातून एक छोटासा कागद काढला आणि आपल्या पेननं तो त्या कागदावर काहीतरी चित्र काढू लागला. जवळपास दहा मिनिटांमध्ये पिकासोनं त्या कागदावर एक पेंटिंग काढलं आणि तो कागद त्या महिलेला देत तो म्हणाला, "हे घ्या पेंटिंग. तुम्हाला याचे...

19 उंटाची गोष्ट

*१९ उंटांची गोष्ट* *एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.* *एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.* *त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.* *ज्यामध्ये असे लिहिले होते की..*  *माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.*  *अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.*  *१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.*  *त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.*  *त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?*  *सगळेच खूप गोंधळले होते.*  *तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.* *तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.* *समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.* *मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.*  *प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.* *तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्य...

कांदे विकल्यावर बघू

"#कांदे विकले की बघू..." या एका वाक्यात कितीतरी स्वप्नं दाटलेली असतात. पोराचं सायकलच स्वप्न, लेकीच्या लग्नाचं सुखी भविष्य, बायकोच्या मळक्या पदरातलं नव्या साडीचं स्वप्न आणि शेतमालाच्या किमतीवर आधारलेलं शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य! माणसासारखं जगावं म्हणून शेतकरी रोज उन्हातान्हात राबतो. पाऊस आला की पाणी भरतो, नाही आला तर आसवांनी रान पिकवतो. रानावरचा माल तसा छान तयार होतो, पण बाजारात पोहोचल्यावर तोच माल मातीमोल विकतो. पोराच्या सायकलचं स्वप्न दूर होतं, लेकीचं शिक्षण अर्धवट राहतं, बायकोचं सौभाग्याचं लेणं सावकाराच्या गहानखात सडतं, आणि बापाच्या डोळ्यांतलं जगण्याचं स्वप्न मात्र त्या कांद्याच्या ढिगाऱ्यात पुरलं जातं. "कांदे विकले की बघू" म्हणतच बाप रोज माघारी फिरतो, पण लेकरं त्याच्या ओस पडलेल्या चेहऱ्यातलं दुःख ओळखून त्याच्या स्वप्नांना हळूहळू मागे सारतात. बाप फाटक्या बनियनवर समाधान मानतो, लेकरं जुने पुस्तकं उघडून आपले नवे भविष्य शोधतात, आणि बायको गळ्यातला हुंदका गिळून पुढच्या हंगामाची तयारी करत राहते. पण... आम्ही शेतकरी असतो म्हणून आमचं स्वप्नं विझत नाहीत. कधी तरी चांगला हंगाम...