माझी आजी (कविता ) माझी होती लाडकी आजी, माझी नि फक्त माझी ||धृ || आजी पावसात भिजली, उन्हात राबली. राबराब राबली, पण कुणावर कधी नाही रागावली. साधी सोज्वळ भोळी आजी. माझी होती लाडकी आजी ||1|| तिच्या सारखीच तिच, सरळ मार्गानं चालणारी. कधीही न रुसणारी, कायम हसणारी. सदा न कदा कामात गुंतणारी. माझी होती लाडकी आजी ||2|| आजी सरळ चालली, सरळ वागली. दुसऱ्याच्या वाटेतलं काटे उचलत चालली. सदा देत राहणे, वसा ती देत राहिली. माझी होती लाडकी आजी ||3|| आल्यागेल्या जवळ गुणगान,ती माझंच गाई. नातू माझा असा, नातू माझा तसा, सगळ्यांना सांगत राही. आई तुझ्याच आठवणीने आज डोळ्यात पाणी येई. माझी होती लाडकी आजी ||4|| आजी घर आमचे सुनेसूने, तू आज नाही, आठवण येते मनोमनी अश्रू आवरत नाही. सारे जग जरी फिरलो तरी, आजी तू दिसणार नाही. माझी होती लाडकी आजी ||5|| आजी वसा तुझा आम्ही जपू मनोमनी, येणाऱ्या-जाणाऱ्याला घास घालुनी. देतो हीच भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या चरणी. माझी होती लाडकी आजी ||6|| श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे. जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर मोबाईल 7588025491