प्रारब्ध

*प्रारब्ध*
*******************
*केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही.*
*म्हणून उगाच असं झालं, तसं झालं ,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे  सगळं विसरा.*

  *कारण जे झालं  ते तसंच  होणार होतं. ते आपलंच पूर्वीच  केलेल कर्म आहे.*
_____________________

*कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली.*

 *तेव्हा देवकी त्याला म्हणाली,_*

_*"हे कृष्णा!!*,_

*अरे तू स्वतः साक्षात्* *परमेश्वराचं रूप आहेस ना?.*
*तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास...!*

 *मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास ?* 
  
*यावर श्रीकृष्ण म्हणाले.*
*माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस ?"*
      
*श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.*
   
 *देवकी म्हणाली मी?....*
*अरे मी कधी तुला चौदा  वर्षं वनवासात पाठवलं  होतं.... ?*_
*हे काय बोलतो आहेस तू.... ?*

*त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,*_

*"माते  ही घटना  गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही.*

*पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस...*
*आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.*

 *हे ऐकून देवकीला धक्काच बसला,*

*आणि तिने आश्चर्याने विचारलं,कृष्णा*
*मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग*

   *त्या जन्मातली कौसल्या कोण...?*

 *यावर श्रीकृष्ण हसून वदले,__* 

 *माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय.* 

*जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं.* 

 *तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं.....*

*आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.*

*"माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात.....त्यातून देवांचीही सुटका होत नाही....!*
 _________________
*विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही.*

*गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे.*

*आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात.*
*******************
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ