चिमणी उडाली भुर्रर्रर्रर्र.....
चिमणी उडाली भुर्रर्र........ आज सोमवार 20एप्रिल 2026 रोजी पहाटे 4.30 च्या एमरेट्स च्या फ्लाईटने माझी लाडकी लेक श्रुती ऐरोस्पेस ची एमईएस डिग्री पूर्ण करण्यासाठी टेक्निकल युनिव्हर्सिटी डॅमस्तर्ड जर्मनीला रवाना झाली.Btec.मॅकनिकल ची डिग्री COEP कॉलेज पुणे येथे पूर्ण झाल्यावर तिने मास्टर साठी जर्मन भाषा शिकून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवला.सगळी कागद पत्रे पूर्ण करुन,सगळे डोकमेंट्स जमा करत,पासपोर्ट,व्हिजा हॉस्टेल,कॉलेज चे ऍडमिशन असे सारे काही अथक प्रयत्न करुन तिने 2 वर्षाच्या मास्टर डिग्रीला प्रवेश मिळवला आणि आज आम्ही सर्वजण श्रुतीला मुबंईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमान तळावर रात्री 1 वाजता सोडवण्यासाठी पोहचलो.आणि पहाटे 4.30 च्या मुंबई ते फ्रँकफ्रंट या विमानाने ती जर्मनीला रवाना झाली. लहान पणापासून इयत्ता 1 ली पासून सर्व क्षेत्रात तिने सतत परिश्रमाने यश संपादन केले.चित्रकला एलिमेंटरी, इंटरमिजिट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला,क्रीडास्पर्धा मध्ये COEP चे कबड्डी मध्ये नेतृत्व करत राष्ट्रीय पातळीवर कबड्डीत प्रथम क्रमांकाने यश संपादन ...