चिमणी उडाली भुर्रर्रर्रर्र.....

चिमणी उडाली भुर्रर्र........
आज सोमवार 20एप्रिल 2026 रोजी पहाटे 4.30 च्या एमरेट्स च्या फ्लाईटने माझी लाडकी लेक श्रुती ऐरोस्पेस ची एमईएस डिग्री पूर्ण करण्यासाठी टेक्निकल युनिव्हर्सिटी डॅमस्तर्ड  जर्मनीला रवाना झाली.Btec.मॅकनिकल ची डिग्री COEP कॉलेज पुणे येथे पूर्ण झाल्यावर तिने मास्टर साठी जर्मन भाषा शिकून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवला.सगळी कागद पत्रे पूर्ण करुन,सगळे डोकमेंट्स जमा करत,पासपोर्ट,व्हिजा हॉस्टेल,कॉलेज चे ऍडमिशन असे सारे काही अथक प्रयत्न करुन तिने 2 वर्षाच्या मास्टर डिग्रीला प्रवेश मिळवला आणि आज आम्ही सर्वजण श्रुतीला मुबंईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमान तळावर रात्री 1 वाजता सोडवण्यासाठी पोहचलो.आणि पहाटे 4.30 च्या मुंबई ते फ्रँकफ्रंट या विमानाने ती जर्मनीला रवाना झाली.
लहान पणापासून इयत्ता 1 ली पासून सर्व क्षेत्रात तिने सतत परिश्रमाने यश संपादन केले.चित्रकला  एलिमेंटरी, इंटरमिजिट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला,क्रीडास्पर्धा मध्ये COEP चे कबड्डी मध्ये नेतृत्व करत राष्ट्रीय पातळीवर कबड्डीत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आणि National level वर आपल्या खिलाडू वृती आणि खेळाची चमक दाखवली ,आणि गुणवत्तेत ती नेहमी अव्वल असते.इयत्ता पाहिली पासून आज पर्यंत डिग्री पूर्ण होई पर्यंत सातत्याने प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले.इयत्ता 10 वीला तर तिने NMSS च्या परीक्षेत राज्यात 25 वा क्रमांक प्राप्त केला.आणि SSC ला 98.60 टक्के गुण प्राप्त करत आंबेगाव,जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.त्यांच्या ज्ञान मंदिर हायस्कुल आळे ता.जुन्नर जि.पुणे या शाळेच्या  बक्षीस वितरणाच्या वेळी तिच्या बक्षीसांची यादी सूत्रसंचालन करणारे सर 5 मिनिटे सांगत होते.इयत्ता नववीला असताना डॉ.ए.पी जे अब्दुल कलाम यांचे अंग्निपंख पुस्तक वाचले आणि एरोस्पेस घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेतली.IIT ( Indian Institute of Technology ) सारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन इंजिनियर होण्याचे स्वप्न होते.तिचे ते स्वप्न पण जेई ऍडव्हान्स मध्ये अल्प मार्क कमी पडले.त्यामुळे अपुरे राहिले.NIT नागपूर मध्ये ऍडमिशन मिळत असताना,ते नाकारत COEP  कॉलेज पुणे येथे प्रवेश घेतला आणि आणि मॅकनिकल ची पदवी  प्रथम क्रमांक प्राप्त करत पूर्ण केली.स्नायडर इलेट्रिक सारख्या नामवंत कंपनीत तेरा लाख रुपयाचे पॅकेज मिळाले.पण ते नाकारत तिने मास्टर डिग्री पूर्ण कारण्याचे ठरविले.आज ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाडकी लेक जर्मनीला रवाना झाली.त्यामुळे तिचा मला खूप अभिमान वाटतं आहे,,लहानपणापासूनच प्रत्येक वेळी अभिमान वाटणारे यश ती मिळवत  आली आहे.आणि यापुढे ही यशाची सर्व दारे साई बाबांच्या कृपेने आपल्या सारख्या सर्व लहान थोरांच्या आशिर्वादामुळे,आणि मित्र,नातेवाईक,  गुरुजणांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा यामुळे नक्कीच पूर्ण होईल.आज लेक शिकायला गेली,पण सारे घर खूप रिकामे झाल्यासारखं वाटतय,चिमणीचा चिवचिवाट फक्त मोबाईल वर ऐकायला मिळेल.अनुभवायला कमी मिळेल.तिच्या या सर्व धाडसाला अगदी 100 तोफांची सलामी 🕺🕺🕺असो मनात सतत अभिमान ठेवून,तीला उच्च शिक्षण आणि तिच्या हातून घडणारे सत्कार्य,राष्ट्रीय कार्य,मानवतेच्या हिताचे कार्य सतत घडत राहो.अतिशय पर्यावरण प्रेम अगदी चॉकलेट खाल्ले तरी कागद कुठंही न टाकता कचरा डब्यात टाकणे.प्राण्यांविषयी सतत दया भाव जोपासणे,त्यांना जखम झाली तर त्यांना दवाखाना नाही,त्यांना दवाखाण्यात जाता येत नाही असा उदात्त आणि विशाल दृष्टीकोन जोपणासनारी,छोट्या छोट्या गोष्टीत निरीक्षण करुन काहीतरी नवीन शोधणे,त्या छोट्या गोष्टीला आकर्षक पणा प्राप्त करुन देणे,उच्च दर्जाची चित्रे काढणे,फोटो फोटोग्राफी करणे,सतत अनावश्यक खर्च टाळणे या रील्स तयार करणे अभ्यास करणे आणि कितीही परिश्रम लागले तरी यश संपादन करणे, असं म्हणतात "मुलगी ही बापाच्या काळजाचा तुकडा असते,पण मी असं म्हणेल की बापाचं काळीजच मुली असतात".ज्यांच्या जन्मामुळे बापाला खरं पितृत्व प्राप्त होते.अश्या अनेक सदगुणांना सॊबत श्रुतीला  सतत यश मिळत राहो.श्रुतीस उच्च शिक्षणासाठी आणि जॉब साठी खूप खूप....साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा.......... 🌹🌹🌹🌹🌹🌹लाडकी लेक श्रुती Best of luck for U beta 💖

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ