Posts

Showing posts from January, 2026

साधी राहणी उच्च विचार

𒆜 *ओंजळीतली फुले...* > "कोणालाही न दुखवता जगणे, या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही." ✒️ सत्य घटना! लंडनच्या प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर एक भारतीय महिला विमानाची वाट पाहत होती. तिचा पेहराव अत्यंत साधा होता. अंगावर साधी सुती साडी आणि वागण्यात कमालीचा साधेपणा. ती महिला विमानतळावरील 'बिझनेस क्लास' च्या तिकिटांच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिच्या मागेच एक दुसरी श्रीमंत दिसणारी भारतीय महिला उभी होती. तिने या साध्या वेषातील बाईकडे पाहिले आणि नाक मुरडले. तिच्या महागड्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या झगमगाटापुढे पुढची महिला तिला अगदीच गरीब किंवा अशिक्षित वाटली. त्या श्रीमंत महिलेला रहावले नाही. तिने टोमणा मारला, "हॅलो, तुम्हाला समजतंय का? ही 'बिझनेस क्लास'ची लाईन आहे. इकॉनॉमी क्लासची रांग तिकडे पलीकडे आहे. तुम्ही तिथे जाऊन उभ्या राहा." साध्या वेषातील महिलेने तिच्याकडे वळून पाहिले पण काहीच उत्तर दिले नाही. त्या फक्त शांतपणे स्मितहास्य करून तिथेच उभ्या राहिल्या. हे पाहून मागच्या महिलेचा पारा चढला. तिने आपल्या सोबतच्या मैत्रिणीशी जोरात बोलायला सुरुवा...