Posts

Showing posts from September, 2025

विश्वास जपता आला पाहिजे

💙 ❤️ *विश्वास जपता आला पाहिजे* ➖➖➖➖➖ 🚇 वडापाव विकणारा राजू ट्रेनच्या मागे पळत होता. त्याच्या छोट्या हातात वडापाव घट्ट पकडलेला होता. ➖➖➖➖➖ ट्रेन सुटताच त्याने ट्रेनमधल्या एका माणसाला तो वडापाव विकला. दोघांचीही घाई झाली – एकाला पैसे द्यायचे, दुसऱ्याला पैसे घ्यायचे होते. राजू अजून ट्रेनच्या मागे पळत हात पुढे करत होता, तो माणूस दारात उभा राहून खिशातून पैशांचे पॉकेट काढत होता. गाडीने वेग घेतला, राजू मागे राहू लागला.. क्षणभर त्या माणसाच्या मनात आले – "आता पैसे देऊन काय उपयोग… जाऊदे, नको द्यायला!" मनात थोडी कपटभावना आली. पण… पॉकेट परत खिशात ठेवताना चुकून मोबाईल आणि पॉकेट दोन्हीही खाली पडले! तो घाईघाईने पकडायला गेला, पण ट्रेन थोडी वेगाने पुढे गेल्याने शक्य झाले नाही. पॉकेट व मोबाईल ट्रॅकवर पडून राहिले. त्या माणसाचा जीव घाबरला – त्यात प्रवासाचे पैसे, खर्चाचे पैसे, तिकीट सगळं होतं. तो माणूस कोपऱ्यात जाऊन बसला, शरमेने आणि भीतीने डोळ्यात पाणी आले. शेजारी ठेवलेला वडापावसुद्धा खाण्याची त्याची हिम्मत झाली नाही. थोडावेळ गेला. गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली  TC डब्यात चढला. तिकीट तपासणी सुरू ...

ऋ्तूंची भविष्यवाणी

ऋ्तूंची भविष्यवाणी.* पाऊस आता ठरलेल्या ऋतूतच येत नाही. हिवाळ्याच्या अंगणात तो गडगडाट करत येतो, उन्हाळ्याच्या दुपारी तो पानगळलेल्या झाडांना भिजवतो. जिथे सूर्य तळपायचा, तिथे काळे ढग मुक्काम ठोकतात, आणि जिथे थंडीचा शिरशिरा असावा, तिथे उकाड्याची जाळ घुसमटवते. ऋतुंचं हे विस्कळीत नृत्य फक्त बदल नाही, तर एक इशारा आहे... मानवाच्या अधर्माला, त्याच्या अतिरेकी लोभाला निसर्गाचे थेट प्रत्युत्तर. जगातील प्रत्येक ऋतु बदल हा एक घंटानाद असतो. आगामी काळाच्या दारावर वाजणारा इशारा. कधी मंद, कधी गडगडाटी, पण कायम सतर्क करणारा. आजचा पाऊस जणू सांगतोय... "मी वेळेच्या चौकटीत नाही, कारण तुम्हीच काळाचा तोल ढवळलात. तुम्ही ऋतुंचं संतुलन बिघडवलं, आणि आता माझं आगमन हे तुमच्या भवितव्याची पहिली घोषणा आहे. आकाशात ढग आहेत, पण त्यांचा चेहरा ऋतुसंगतीचा नाही. वार्‍याचा स्पर्श थंडावा द्यायचा, तोच आता चटका लावतो. फुलं उमलतात, पण त्यांचा सुगंध हरवलेला. निसर्गाच्या वीणेवरची प्रत्येक तार जणू विस्कटली आहे. कधी शरदात वाजते पावसाची गाणी, कधी पावसाळ्यात दाहक उन्हाची ज्वाला. ही लय निसर्गाने नाही मोडली, ही आपणच मोडली आहे. माणसाच्...

नदी आपली वाट विसरत नसते

*नदी आपली वाट विसरत नसते....!!!!*  २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला समजले कि मुंबईत मिठी नावाची नदी आहे.  मी ९ वर्षे कोल्हापुरात राहिलोय. शेकडो वर्षांपासून कोल्हापूरच्या मध्यातून एक छोटी नदी वाहत होती. हळू-हळू तिच्या दोन्ही तीरावर अतिक्रमण करून,घर-दुकान बांधून, लोकं एवढ्यावरच थांबली नाहीत, तर सगळ्या कोल्हापूरची गटार त्यामध्ये आणून सोडली आणि नदीचच नाव बदलल "जयंती नाला" २०१९ आणि २०२१ मध्ये याच जयंती नाल्यान निम्मं कोल्हापूर चार दिवस पाण्यात बुडवलं होत. माणसांनी नदीचा नाला केला म्हणून नदी स्वतःच अस्तित्व विसरत नाही. तीच अवस्था चेन्नईची. चाळीस तलावांना जोडणारी एक छोटीसी नदी चेन्नईतून जाऊन पुढे समुद्राला मिळत होती. हपापलेल्या माणसांनी चाळीस तलाव मुजवून सिमेंटची जंगल उभा केली एवढयावरच थांबली नाहीत तर चेन्नईतील नदीचं गायब केली. एका दिवसाच्या  पावसानं नदी आणि तलावांनी मिळून चेन्नई पाण्यात बुडवली. जोडीला विमानतळावरची विमान बदकासारखी पाण्यावर पोहायला सुद्धा लावली. हीच अवस्था पुण्याची झाली आहे. मुळा-मुठा नद्यांपेक्षा युरोप-अमेरिकेतील गटार मोठी असतील अशी ...

अंबिका माता

*कुलस्वामिनी अंबिका माता*                       देविभोयरे        भगवान शंकराची उमा महेश्वरी नाम तुझे अष्टभुजा अंबाबाई सर्व ब्रम्हांडाची तु पालनकर्ती भक्तांच्या हाकेला पावसी लवलाही पाटणच्या नारायणाने घडविली सोनपितळी धातुंची तुझी मुर्ती दक्षिणाभिमुख तुला स्थापिली जगदंबा तुझी जगभर किर्ती  पंडित शंकर देवराव क्षिरसागर नामे उच्चकुळी ब्राम्हण घरची तु देवता त्यांनीच मनोभावे केली स्थापना अवतार महाकालीचा जीता जागता नाकी नथ रत्नजडीत सुवर्णाची हिरवी साडी परिधान करून मांगल्ल्याचे विलोभनीय रूप भक्त पाहती डोळे भरून हाती त्रिशुल, शंख, चक्र आयुधे शिरी मुकुट भाळी कुंकवाचा टिळा पायी पैंजण,तोडे, जोडवी,मासोळ्या गळा पुतळ्या,मंगळसुत्र, मोहनमाळा प्राण्यांतील सिंह वाहन तुझे उभा मंदिराच्या प्रवेशव्दारी येताना प्रथम त्याचेच दर्शन भक्तिभावाने घेतात सारी रोज पहाटे अन् संध्याकाळी देविची होते नेमाने आरती तिच्या नित्य नित्य दर्शनाने सर्व इडा, पिडा व दुःखे सरती नवरात्रातील नऊ दिवसात होतो साजरा नवरात्र सोहळा पाहुन भक्तांचे फिटते पारणे य...

वृद्धाश्रम

*पितृ पक्षात खतरनाक संदेश* ...*  *भारतातल्या 1150 वृद्धाश्रमांपैकी एकातही  एकही मुस्लिम नाही, असे का*? सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,  आपली संस्कृती जगात महान आहे.   हिंदू संस्कृती महान आहे.  देशात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे खोटे आहे. एका अहवालानुसार *भारतात ११५० वृद्धाश्रम* आहेत  व या *वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात.*  महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्त्वावर चालवले जातात.  स्वत:ला सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या *पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रम आहेत.* महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे.  पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत.  *हिंदूंना लाज वाटली पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडते ?* हिंदू ऊपवरमुली पळून का जातात ? ? ? ? दुसऱ्या धर्मियांना नाव ठेवताना आपण आपला धर्म व परंपरा खरोखरचं जपतो का ? ? ? आपला धर्म धोक्यात आहे असा प्रचार कोण करत ? आणि खरंच तसं असेल तर आपल्या घरी येऊन दुसरं कोणी आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करतयं का ? ?  आणि जर त...

पितृपक्ष आणि कावळे

(आपली संस्कृती आणि थोर पुर्वजांचा थोरपणा.) 🌸🌿 पितृपक्षामध्ये आपल्या पुर्वजांची आठवण म्हणून आपण पितृपक्षातील १५ दिवस आपण स्मरण करतो. आयुष्याच्या धावपळीत क्षणभर थांबून आपण आपल्या पुर्वजांची आठवण, त्यांची आवड-निवड हे सुद्धा आठवतो. हे नित्यनेमाने घडावे म्हणून वर्षभरातील काही काळ ठरवून दिलेला आहे. मग ते नियोजन, शिस्त किंवा नियम म्हणा काही अडचण नाही व यात कसली अंधश्रद्धा ही नाही. परंतु अनेकदा काही जणं म्हणतात, एवढे अनेक पक्षी आहेत मग फक्त कावळ्यालाच पितृपक्षात महत्व का? "अश्वस्थ" हे संस्कृत नाव असलेला *पिंपळ* हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील (वड व उंबर सुद्धा) असून त्याचे शास्त्रीय नाव "फायकस रिलिजिओआ" असे आहे.  तर हा पिंपळ जगात सर्वाधिक प्राणवायू (oxygen) देणारा आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारा एकमेव वृक्ष आहे. परंतु हा पिंपळ उगवतो कसा? तर ह्या पिंपळाचे कोवळे पिकलेले फळ पक्षी खातात. हे फळ पचायला कठीण असते. हे न पचलेल्या फळातील बीया पक्षाच्या (फक्त कावळ्याच्या) विष्ठेतून अंकुरीत होतात. त्यामुळे पिंपळाची झाडे अनपेक्षित ठिकाणी उगवलेली दिसतात. ह्या मधील पिंपळाचे झाडाच्या ब...

माहेरची साडी

🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀 *जिवंतपणी तिला मिळावी माहेरच्या साडीची ऊब.* *ऑफिसमध्ये असताना मला आईचा अचानक फोन आला, " पटकन घरी ये आत्या गेली, आपल्याला चिपळूणला जायजे आहे."* *माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. डोळ्यातील पाणी पुसत ती कशीबशी घरी पोहचले. गाडी दारात उभी होती. घरात न जाता थेट गाडीत बसले, आणि आम्ही निघालो.* *पुढच्या चौकात गेल्यावर आईने एका साड्यांच्या दुकानापाशी गाडी थांबवली. तेव्हा मला काही कळेना. प्रसंग काय आणि ही करतेय काय हा विचार मनात असतानाच तिने एक साडी पिशवीत घालून आणली. पाच मिनिटात खरेदी केलेली ही पहिली साडी असेल, पण ती अशावेळी आईने का घेतली, हे विचारल्यावर तिने सांगितले, "लेक गेल्यावर तिला माहेरची साडी नेसवली जाते."* *ती गेल्यावर तिच्या अंगावर घातलेल्या साडीचं सुख तिला मिळणार आहे का? हा प्रश्न घेऊन आत्याच्या चितेवर शेवटची " माहेरची साडी"चढवली.* *या गोष्टीला आज पंधरा दिवस झाली... मात्र अजूनही माझ्या डोक्यातून ही माहेरची साडी गेली नव्हती. आपल्या रीती आणि परंपरा सुध्दा कशा आहेत ना... माणूस जिवंत असताना आपण त्याची ख्यालीखुशाली विचारत नाही, पण तो गेल्याव...

हेड मास्तर

सून आरशात लिपस्टिक लावत म्हणाली – “आई, आज तुम्ही स्वतःच्या जेवणाचे बघा बरं का... आम्ही दोघं एका पार्टीला जाणार आहोत...!!” आई शांतपणे म्हणाली – “बाळा, मला गॅस पेटवायलाही जमत नाही गं..!!” मग मुलगा म्हणाला – “आई, आज मंदिरात भंडारा आहे. तू तिथे जा, स्वयंपाकाची काहीच चिंता नाही...!!” आई शांतपणे चप्पल घालून मंदिराच्या दिशेने निघाली... हे सगळं दहा वर्षांचा रोहन कान देऊन ऐकत होता. तो वडिलांबरोबर गाडीत बसला आणि म्हणाला – “पप्पा, मी मोठा माणूस झालो की माझं घर नक्की मंदिराशेजारीच बांधेन...!!” “कारण, कधी मी आणि माझी बायको पार्टीला गेलो तर तुम्हालाही जेवायला दूरवर मंदिरात भंडाऱ्याला जावं लागू नये... मला नको आहे की तुम्ही त्रास करून दूरवर जाल...!!” हे ऐकून मुलगा आणि सुन  दोघांचेही डोळे पाणावले. त्यांनी लगेच गाडी वळवली आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला. “आईच्या पायाशी बसून माफी मागायची,” असा दोघांचा निश्चय झाला. गाडी पार्क करून जेव्हा ते दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोहोचले, तेव्हा आतून गाण्यांच्या तालावर हशा आणि गप्पांचा आवाज येत होता. मुलाने बेल वाजवली. आतून आवाज आला – “शारदाजी, दार उघडा... वाटतं...

निपुत्रिक

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती.  तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,  'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात  झाला आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले' यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला.  मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.  अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता. वेणुताई अत्रेंना म्हणाल्या  भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते. तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते. आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले.  ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत  ? हा यशवंतराव साहेबांचा  महा...

निरोपाचा क्षण

निरोपाचा क्षण                                  आज आदर्श जि.प.प्रा.शाळा निर्मल ग्राम कळस शाळेतील आजचा निरोपाचा दिवस.....   आपल्या मागील सात ते आठ वर्षातील कालखंडाकडे हळूच मागे वळून पाहताना.. आपण लावलेली झाडे आपले घडलेले विद्यार्थी या सर्वांकडे पाहताना मनात हुरहूर दाटून येईल...कंठ दाटून येतो,मुलांच्या नजरेला नजर भिडवताना अश्रू अनावर होतात....  काहीच फरक पडणार नाही,असे म्हणताना खूप काही फरक शिल्लक ठेवून शाळेचा निरोप घेताना मनामध्ये आठवणींचे वादळ उठते शब्दभेदी बाण विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागतील, सर्वांना हा क्षण सामोरा असताना नकळत डोळ्यांच्या कडा पानवतील... थोडा वेळ मन स्तब्ध राहिले... ...... पुन्हा एकदा म्हणेल जन पळभर म्हणतील हाय हाय...  मी जाता राहील काय?   पण नक्कीच प्रत्येकाच्या आठवणी त्या त्या शाळेत जपून राहतील.. त्याच्यासाठी, इतरांसाठी...  काही व्यक्त होतील काही व्यक्तही होणार नाहीत ... पण आपले कार्य नक्कीच प्रेरणा देत राहील... नवे नक्कीच मिळतील... म्हणुन जुने अडगळीत प...

कोहिनुर हिरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातील पीएच.डी. संपल्यातच जमा होती. ‘ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्तव्यवस्थेचा विकास’ असा विषय बाबासाहेबांचा होता. या विषयासाठीची कागदपत्रे त्यांना लंडनलाच मिळण्याची शक्यता होती. पीएचडीचा अखेरचा टप्पा होता आणि बाबासाहेबांना वेध लागले होते लंडनचे. हे १९१६ साल होते. पहिले महायुद्ध सुरू होते. अमेरिका अद्याप युद्धात उतरलेली नसली तरी इंग्लंड उतरलेले होते. आणि, बाबासाहेबांकडे वैध पासपोर्ट नव्हता. वारंवार मागणी करूनही तो मिळत नव्हता. तरूण बाबासाहेबांचा संयम आता मात्र सुटला. कोणताही विचार न करता ते लिव्हरपूलला जाणार्‍या बोटीत बसले. त्यावर बराच गदारोळ झाला. मात्र, बाबासाहेब लंडनला येऊन दाखल झाले.  संदर्भ शोधण्यासाठीच बाबासाहेब आले खरे, पण मग त्यांना ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’चे महत्त्व लक्षात आले. एक तर, अर्थशास्त्राचे मोल बाबासाहेबांना माहीत होते. त्यात, ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ला अनन्यसाधारण महत्त्व होते. शिवाय, ब्रिटिश पदवीचे मोल अधिक होते. एक म्हणजे, तेव्हाचा भारत हा ब्रिटिश भारत होता. अमेरिका शक्तिमान व्हायला आणखी अवकाश होता. कारण काहीही असो....

भेट

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥  एक छोटी कविता खास मित्रांसाठी. *---------------------------------------*                  *स्नेहमेळा*  👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼           *भेटण्यासाठी* *मन माझे झालेय बर आतुर* *कसा असेल माझा सखा चतुर*          *भेटण्यासाठी* *शब्द माझे येतात ओठी* *पुन्हा होतील मित्रांच्या गाठी*          *भेटण्यासाठी* *डोळे कासावीस आहेत माझे*  *रूप न्याहळील मित्रा मी तुझे*          *भेटण्यासाठी*  *पाय  माझे  उरकतील वाट* *आता होईल मित्रांची गाठ*          *भेटण्यासाठी* *कर्ण माझे फार अधीर होई* *मित्रांचे गोड शब्द कानी येई*          *भेटण्यासाठी* *हृदय माझे ऋण कंप पावते* *मैत्रीचे नाते अधिक दृढ होते*          *भेटण्यासाठी* *मी उभा असेल दोन्ही कर जोडुनी* *तुझ्या प्रतीक्षेत अश्रू येतील नयनी* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏...

देव आणि माणूस

*देव आणि माणूस* *                           देव आहे असे मानतो तो आस्तिक , देव नाही असे मानतो तो नास्तिक ! नास्तिकच खरा आस्तिक असतो असे मानणाराही एक प्रवाह आहे. नास्तिकच खऱ्या अर्थाने देवाचा शोध घेत असतो, आस्तिक देवाचा शोध घेत नाही, तो मानून चालतो. देव ही केवळ श्रध्देची किंवा मानण्याची गोष्ट नाही. देव ही जाणण्याची -शोधण्याची गोष्ट आहे. देवाचा शोध घेण्यासाठीच विवेकानंद रामकृष्णांकडे गेले. कालिमाता तुम्हाला दर्शन देते तसे दर्शन मला घडवा म्हटले. घरचं दारिद्र्य दूर करण्यासाठी  मला तिच्याकडून धन मागून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात गुरुंनी कालिमातेचं दर्शन घडवलं तेव्हा धन मागायचं विसरूनच गेले. माते मला ज्ञान, विवेक , वैराग्य दे म्हटले. तुकोबाही म्हटलेत, 'देव पाहावयासी गेलो देवचि होवोनी ठेलो। ' देव भेटला की माणूस देवच होतो. दैवी संपदाच मागतो. मध्ये वाटेतच पूजारी भेटला की, देवाची भेट राहूनच जाते. मग आपण पूजापाठ,मंत्रतंत्र,जपजाप्य, होमहवन, व्रतवैकल्य, विधीउपाधी यातच अडकून जातो. ओशो म्हणतात,' पूजा सौदा है , भक्ती नही। क्या पूजार...