पितृपक्ष आणि कावळे


(आपली संस्कृती आणि थोर पुर्वजांचा थोरपणा.)
🌸🌿
पितृपक्षामध्ये आपल्या पुर्वजांची आठवण म्हणून आपण पितृपक्षातील १५ दिवस आपण स्मरण करतो.
आयुष्याच्या धावपळीत क्षणभर थांबून आपण आपल्या पुर्वजांची आठवण, त्यांची आवड-निवड हे सुद्धा आठवतो.

हे नित्यनेमाने घडावे म्हणून वर्षभरातील काही काळ ठरवून दिलेला आहे. मग ते नियोजन, शिस्त किंवा नियम म्हणा काही अडचण नाही व यात कसली अंधश्रद्धा ही नाही.

परंतु अनेकदा काही जणं म्हणतात, एवढे अनेक पक्षी आहेत मग फक्त कावळ्यालाच पितृपक्षात महत्व का?

"अश्वस्थ" हे संस्कृत नाव असलेला *पिंपळ* हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील (वड व उंबर सुद्धा) असून त्याचे शास्त्रीय नाव "फायकस रिलिजिओआ" असे आहे. 
तर हा पिंपळ जगात सर्वाधिक प्राणवायू (oxygen) देणारा आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारा एकमेव वृक्ष आहे.

परंतु हा पिंपळ उगवतो कसा?
तर ह्या पिंपळाचे कोवळे पिकलेले फळ पक्षी खातात. हे फळ पचायला कठीण असते. हे न पचलेल्या फळातील बीया पक्षाच्या (फक्त कावळ्याच्या) विष्ठेतून अंकुरीत होतात.
त्यामुळे पिंपळाची झाडे अनपेक्षित ठिकाणी उगवलेली दिसतात.
ह्या मधील पिंपळाचे झाडाच्या बीया उगवण्यासाठी *कावळा* हा पक्षी फार महत्त्वाचा आहे.

आजच्या आधुनिक जगात पृथ्वीचे वातावरण दिवसेंदिवस उष्ण होत असून त्यामुळे नवनवीन किटक आणि आजार उत्पन्न होत आहेत.

अशावेळी कार्बन डायऑक्साइड शोषण सर्वाधिक प्राणवायू देवून वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी पिंपळाचे झाड निसर्गासाठी  फार महत्त्वाचे आहे आणि *कावळा* सुद्धा.

जयाचिया द्वारी सोन्याचा पिंपळ|
अंगी ऐसे बळ रेडा बोले||
    - जगद्गुरु तुकाराम महाराज

आपला दिवस सुखाचा जावो.

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ