Posts

TET

*TET:*           *कागदावरची 'पात्रता' आणि वर्गातली 'माणुसकी'* कागदावरचे गोल काळे करताना आयुष्याचे रंग विसरलो होतो... मार्कशीटवर 'पास' झालो, पण कोवळ्या डोळ्यांतले प्रश्न वाचायला हरलो होतो! रात्रीचे दोन वाजले आहेत. घराच्या एका कोपऱ्यात डिम लाईट सुरू आहे. डोळ्यांवर जळजळ आहे, पण समोर बालमानसशास्त्राचे आणि इंग्रजी व्याकरणाचे जाडजूड पुस्तक उघडे आहे. TET ची टांगती तलवार आणि भविष्याची चिंता उराशी बाळगून, सर्व शिक्षक या आठवड्यात रात्र जागवत आहेत. त्यांना फक्त एकच ध्यास आहे — 'TET' (शिक्षक पात्रता परीक्षा) पास होणे. त्यांना माहीत आहे की, जोपर्यंत  या परीक्षेच्या अग्निदिव्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत  हाती 'पात्रतेचे' प्रमाणपत्र येणार नाही.  रात्रभर 'कोहलबर्ग'चे नैतिक विकासाचे सिद्धांत, 'पियाजे'ची बोधनात्मक अवस्था आणि व्याकरणाचे न संपणारे नियम पाठांतर करतोय. पण खिडकीबाहेरच्या शांत अंधारात एक प्रश्न दडलेला आहे, जो त्याला अस्वस्थ करतोय: "खरंच, एका शिक्षकाची माणुसकी, त्याचे धैर्य आणि त्याचे संस्कार चार पर्यायांच्या गोलात मावू शकतात का?...

बोगस पदव्या

चौकात एक दुकान उभं राहीलं.त्यावर पाटी होती इथं पदव्या विकत मिळतील.मग एक राजा तिथ गेला त्यानं स्वतःला सगळ्या पदव्या विकत घेतल्या.त्याच्याकडे सत्ता होती पैसा होता.मग तो त्या दुकानदाराला म्हणाला “अहो,माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी विकत द्या मला.लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे.”       दुकानदार हात जोडत म्हणाला, “माफ करा साहेब आम्ही घोड्यांना नाही गाढवाना पदव्या विकतो..”       त्याने दिलेलं उत्तर हे आजच्या शैक्षणिक अवस्थेला समर्पक उत्तर आहे.         आजपर्यंत ढगफुटीने खचलेला शेतकरी आता पेपरफुटीने घाबरून गेलाय.कारण बांधावर बसून अभ्यास करणाऱ्या त्याच्या लेकरांच्या स्वप्नांचा खून या व्यवस्थेने करायला सुरवात केलेली आहे.        इथला शेतकरी,मोलमजुर आणि मध्यमवर्गीय माणूस आपल्या मुलाला डॉक्टर बनवू शकणार नाही हे लाज आणू पाहणारं सत्य उघड झाल्यानंतरही चौकात जमाव होत नाही याचा अर्थ आपण संपलो आहोत असाच आहे.          कारण 20 मार्काला अभ्यासक्रमात असणाऱ्या नागरिकशास्त्र शिकलेल्या फालतू मेंढरांची गर्दी म्हणजे तुम्ही आ...

ह्रदयस्पर्श

"मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या... आज माझा 'दुसरा वाढदिवस' आहे!" सिग्नलवरच्या पोराचे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या करोडपती आईने थेट रस्त्यावरच हंबरडा फोडला! पुण्यातील चांदणी चौकातील सिग्नलवर दुपारच्या कडक उन्हात गाड्यांची रांग लागली होती. एका आलिशान 'ऑडी' (Audi) कारमध्ये ३५ वर्षांच्या 'अनुराधा' डोळ्यांवर गॉगल लावून बसल्या होत्या. पण त्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडत होते. आज '१५ एप्रिल'. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अनुराधा यांचा ७ वर्षांचा एकुलता एक मुलगा, 'अंश' एका भयंकर अपघातात त्यांना सोडून गेला होता. अंश 'ब्रेन डेड' (Brain Dead) झाला होता, आणि एका धाडसी निर्णयापोटी अनुराधा आणि त्यांच्या पतीने अंशचे सर्व अवयव (Organs) दान केले होते. आज अंशचा स्मृतिदिन होता. अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथश्रमात देणगी देऊन घरी परतत होत्या. तो सिग्नलवरचा प्रसंग आणि एक १० वर्षांचा मुलगा: सिग्नल लाल झाला. उन्हाच्या झळा लागत होत्या. तेवढ्यात एक १०-११ वर्षांचा, घामाने डबडबलेला पण अत्यंत गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या ...

कविता

✨✨✨✨✨✨*शाळा आमची शाळा* ********************************** *शाळा आमची शाळा ही माय माऊली।* *हिने दिली आम्हा ज्ञानाची सावली।।धृ।।*      *शाळेमध्ये आम्ही आनंदाने जातो।*      *दिलेला अभ्यास नियमित करतो।* *संस्कारांची पुंजी इथेच मिळाली।।१।।*      *सुजान नागरिक आम्ही बनू या।*      *दीन-दलितांची सेवा करू या।* *देशप्रेमाची ज्योत इथेच पेटली।।२।।*      *आधुनिक ज्ञान घेऊन आम्ही।*      *बलशाली राष्ट्र घडवू आम्ही।* *मानवतेची पताका इथेच रोवली।।३।।* *--------------------------------------*                           *लेखन*       श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे कळस ता. पारनेर जि. अ . नगर                      मो. 7588025491

चिमणी उडाली भुर्रर्रर्रर्र.....

चिमणी उडाली भुर्रर्र........ आज सोमवार 20एप्रिल 2026 रोजी पहाटे 4.30 च्या एमरेट्स च्या फ्लाईटने माझी लाडकी लेक श्रुती ऐरोस्पेस ची एमईएस डिग्री पूर्ण करण्यासाठी टेक्निकल युनिव्हर्सिटी डॅमस्तर्ड  जर्मनीला रवाना झाली.Btec.मॅकनिकल ची डिग्री COEP कॉलेज पुणे येथे पूर्ण झाल्यावर तिने मास्टर साठी जर्मन भाषा शिकून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवला.सगळी कागद पत्रे पूर्ण करुन,सगळे डोकमेंट्स जमा करत,पासपोर्ट,व्हिजा हॉस्टेल,कॉलेज चे ऍडमिशन असे सारे काही अथक प्रयत्न करुन तिने 2 वर्षाच्या मास्टर डिग्रीला प्रवेश मिळवला आणि आज आम्ही सर्वजण श्रुतीला मुबंईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमान तळावर रात्री 1 वाजता सोडवण्यासाठी पोहचलो.आणि पहाटे 4.30 च्या मुंबई ते फ्रँकफ्रंट या विमानाने ती जर्मनीला रवाना झाली. लहान पणापासून इयत्ता 1 ली पासून सर्व क्षेत्रात तिने सतत परिश्रमाने यश संपादन केले.चित्रकला  एलिमेंटरी, इंटरमिजिट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला,क्रीडास्पर्धा मध्ये COEP चे कबड्डी मध्ये नेतृत्व करत राष्ट्रीय पातळीवर कबड्डीत प्रथम क्रमांकाने यश संपादन ...

साधी राहणी उच्च विचार

𒆜 *ओंजळीतली फुले...* > "कोणालाही न दुखवता जगणे, या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही." ✒️ सत्य घटना! लंडनच्या प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर एक भारतीय महिला विमानाची वाट पाहत होती. तिचा पेहराव अत्यंत साधा होता. अंगावर साधी सुती साडी आणि वागण्यात कमालीचा साधेपणा. ती महिला विमानतळावरील 'बिझनेस क्लास' च्या तिकिटांच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिच्या मागेच एक दुसरी श्रीमंत दिसणारी भारतीय महिला उभी होती. तिने या साध्या वेषातील बाईकडे पाहिले आणि नाक मुरडले. तिच्या महागड्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या झगमगाटापुढे पुढची महिला तिला अगदीच गरीब किंवा अशिक्षित वाटली. त्या श्रीमंत महिलेला रहावले नाही. तिने टोमणा मारला, "हॅलो, तुम्हाला समजतंय का? ही 'बिझनेस क्लास'ची लाईन आहे. इकॉनॉमी क्लासची रांग तिकडे पलीकडे आहे. तुम्ही तिथे जाऊन उभ्या राहा." साध्या वेषातील महिलेने तिच्याकडे वळून पाहिले पण काहीच उत्तर दिले नाही. त्या फक्त शांतपणे स्मितहास्य करून तिथेच उभ्या राहिल्या. हे पाहून मागच्या महिलेचा पारा चढला. तिने आपल्या सोबतच्या मैत्रिणीशी जोरात बोलायला सुरुवा...

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ

*शाळेचे खाजगीकरण; देशाचा विनाश अटळ!*  सदरील लेख पूर्ण वाचून आपल्या कडील सर्वच वाॅटसप गृपवर पाठवून जनजागृती करावी हि नम्रतेने आग्रहाची विनंती 🙏🙏🙏🙏                शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली जाते. हत्ती मानवापेक्षा कितीही ताकदवान असला, घोडा किती चपळ व मजबूत असला आणि बैल भली मोठी बैलगाडी ओढत असला तरी यांच्या ताकदीपुढे मानवाची युक्ती श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याची (गुलाम बनविण्याची) किमया मानवाने साध्य केली आहे. *एखाद्या देशाला युध्द करुन पराजित करण्यापेक्षा डोके वापरून तेथील जनतेला फुकटच्या अन्नधान्याची सवय लावून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येऊ शकते.* सध्या भारताची आणि महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीच्या दिशेने सुरु झाली आहे. सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार नसून व्यापाऱ्यांचे सरकार आहे. *एकीकडे मराठा, धनगर आणि ओबीसींना आरक्षणाचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे सरकारी नोकरी बंद करुन खाजगी ठेकेदारांकडून नोकर भरती करायची. तसेच UPSC विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरुन सचिव पदांच्या खाज...