कविता
✨✨✨✨✨✨*शाळा आमची शाळा*
**********************************
*शाळा आमची शाळा ही माय माऊली।*
*हिने दिली आम्हा ज्ञानाची सावली।।धृ।।*
*शाळेमध्ये आम्ही आनंदाने जातो।*
*दिलेला अभ्यास नियमित करतो।*
*संस्कारांची पुंजी इथेच मिळाली।।१।।*
*सुजान नागरिक आम्ही बनू या।*
*दीन-दलितांची सेवा करू या।*
*देशप्रेमाची ज्योत इथेच पेटली।।२।।*
*आधुनिक ज्ञान घेऊन आम्ही।*
*बलशाली राष्ट्र घडवू आम्ही।*
*मानवतेची पताका इथेच रोवली।।३।।*
*--------------------------------------*
*लेखन*
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे कळस ता. पारनेर जि. अ . नगर
मो. 7588025491
Comments
Post a Comment