Posts

Showing posts from October, 2025

जीव हळवा व्हावा

हा जीव खूप  हळवा  व्हावा म्हणूनच हे सारे नाते असतात!   ते सणांच्या रित रिवांजा साठी  वर्षातून फक्त एकदाच येतात ! भाऊ रोज माझ्या घरी यावा  बहिणीला  कधी नाही वाटलं ! पण आज त्याच्या आठवणीने थेट तीने तीच माहेरच गाठलं ! तीन भावाला ओवाळताना मात्र  जवळून त्याला न्याहाळून पाहणं! अन् माहेरात जरी राहत नसली तरी भावाच्या काळजात रहाणं! दुसरं काय असतं अधीक यापेक्षा   भावाच अन् बहिणीच गोड नात! कितीही सुखात  दुःखात नांदली ते माहेर थोडंआठवणीतून जात! जरी सणाला नाही भेटता आलं कोणी का माहेर विसरून जातं! माहेरच्या अंगणात खेळायल्या  चिमुकल्या पाऊल खुणांच नातं!

कृत्रिम बुद्धिमत्ता

*कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम* -डाॅ. माधव सूर्यवंशी.  माणूस शिकत गेला, त्या प्रमाणात त्याचे जीवन उत्क्रांत होत गेले. माणसाची शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच त्याचे शिक्षण होय.शिक्षण क्षेत्रातील बदलाचा त्याच्या जीवनावर परिणाम झाला. त्या बदलाच्या इतिहासाचा आपण विचार करतो, त्यावेळेस प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभाव असल्याचे जाणवते. छपाई यंत्र, वीज, संगणक, इंटरनेट याच्या शोधामुळे शिक्षणातील बदलाची गती अधिक वाढल्याचे लक्षात येते. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) याची जगभर चर्चा सुरू आहे. शिक्षण ही समाजाची मूलभूत गरज आहे, या शैक्षणिक क्षेत्रावर ए. आय.चा होणारा परिणाम खूप व्यापक स्वरूपाचा आहे. आज शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक असणारे विद्यार्थी,पालक, शिक्षक, प्रशासक आणि धोरणकर्ते या सर्वांवर ए.आय. चा प्रभाव असल्याचे दिसून येते. ऑनलाइन वर्ग,वैयक्तिक मार्गदर्शन,  मूल्यांकन,भाषांतर साधने, प्रयोगशाळा, शैक्षणिक डेटा विश्लेषण या सर्व माध्यमातून ए.आय. चा सुरू असलेला वापर आपल्या लक्षात येतो.   *कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?*...

प्रामाणिकपणा

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥         *मूल्य-प्रामाणिकपणा*      जीवन अनमोल,मूल्य अमोल *--------------------------------*       वडापाव विकणारा राजू ट्रेनच्या मागे पळत होता.h त्याच्या छोट्या हातात वडापाव घट्ट पकडलेला होता.ट्रेन सुटताच त्याने ट्रेनमधल्या एका माणसाला तो वडापाव विकला. दोघांचीही घाई झाली – एकाला पैसे द्यायची, दुसऱ्याला पैसे घ्यायची. राजू अजून ट्रेनच्या मागे पळत हात पुढे करत होता, तो माणूस दारात उभा राहून खिशातून पैशांचे पॉकेट काढत होता. गाडीने वेग घेतला, राजू मागे राहू लागला... क्षणभर त्या माणसाच्या मनात आले –"आता पैसे देऊन काय उपयोग… जाऊदे, नको द्यायला!" मनात थोडी कपटभावना आली. पण…पॉकेट परत खिशात ठेवताना चुकून मोबाईल आणि पॉकेट दोन्हीही खाली पडले! तो घाईघाईने पकडायला गेला, पण ट्रेन थोडी वेगाने पुढे गेल्याने शक्य झाले नाही. पॉकेट व मोबाईल ट्रॅकवर पडून राहिले. त्या माणसाचा जीव घाबरला- त्यात प्रवासाचे पैसे, खर्चाचे पैसे, तिकीट सगळं होतं.तो माणूस कोपऱ्यात जाऊन बसला, शरमेने आणि भीतीने डोळ्यात पाणी आले. शेजारी ठेवलेला वडापावसुद्धा खाण्याची त...

माणुसकी

# शुभ सकाळ....!🌞🧑‍🌾🌹 ➖▪️➖▪️➖▪️➖▪️➖ माणूस जेंव्हा जन्माला  येतो तेव्हा सोबत कोणतीही जात नसते, धर्म नसतो....प्रत्येक जण एकाच रंगाचं रक्त घेऊन जन्माला येतो. कुणी लहान नाही. कुणी मोठा नाही. पण जसजसा तो मोठा होऊ लागतो , तसतसा एक मुखवटा चेहऱ्यावर चढत राहतो . एका साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात! एवढं सुंदर जीवन हातात असताना खोट्या भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते. माणूस धावत राहतो. टॉलस्टॉयच्या कथेसारखे ! सूर्यास्तापर्यंत जेवढी जमीन पायाखाली येईल, तेवढ्या जमिनीच्या मालकीसाठी अथक धावत रहायचं. अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही.  जीव गुदमरून टाकणाऱ्या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठं हातात असतात! काळ मोठा कठोर असतो! मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या दौडीत एकाही पावलापुरता सुखशांतीचा ...

राष्ट्रधर्म

जपान कधीच कोणाचा गुलाम राहिला नाही. इस्रायलप्रमाणेच, तिथेही स्वाभिमानी लोक राहतात. अमेरिकेने त्याच्यावर अणुबॉम्ब टाकले, पण जपान पुन्हा उभा राहिला. पण त्यानंतर त्याने अमेरिकेकडून एक गवताचाही तुकडा घेतला नाही. एक भारतीय गृहस्थ सुमारे वर्षभर जपानमध्ये राहिले. ते अनेक लोकांचे मित्र झाले होते, पण तरीही त्यांना असं वाटलं की जपानी लोक त्यांच्याशी एक मर्यादा राखतात. तिथल्या कोणत्याही मित्राने त्यांना घरी चहा प्यायला बोलावले नव्हते... ही गोष्ट त्यांना फार सतावत होती, म्हणून शेवटी त्यांनी एका जवळच्या मित्राला विचारलं... थोडं संकोच केल्यानंतर, त्या मित्राने जे काही सांगितलं, ते ऐकून तो भारतीय गृहस्थ निशब्द झाले. जपानी मित्र म्हणाला – आम्हालाही भारतीय इतिहास शिकवला जातो, पण प्रेरणा घेण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी! “ब्रिटिशांनी भारतावर २०० वर्षं राज्य केलं, त्यावेळी भारतात किती ब्रिटिश होते…?” भारतीय गृहस्थ म्हणाले, “सुमारे १०,०००!” “मग ३२ कोटी लोकांवर अत्याचार कोणी केला? ते तुमचेच लोक होते ना? जेव्हा जनरल डायरने ‘फायर’ असं म्हटलं... तेव्हा १३०० निषस्त्र लोकांवर गोळ्या कोणी चालवल्या? त्या वेळी तिथे...

एकटा!चलो रे

एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी! गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती? एक चांगला शिकला सवरलेला माणूस, निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात.चेट्टू म्हणजे झाड. (तेलगू भाषेत) म्हणून हा ‘झाडं वाला ...

प्रेरणा प्रवाह

प्रेरणा प्रवाह : "दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख."   शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली, "शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये." शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, "मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?" बाई म्हणाली, "काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १०० रुपये दिले होते. पण तुम्ही ३० रुपयांच्या ऐवजी ४० रुपये परत दिलेत. हेच दहा रुपये घेऊन आले आहे." शेठने त्या दहा रुपयांच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला, "एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना पाच रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघिस करत होता! पण आता हे दहा रुपये परत देण्यासाठी आलात?" बाई सहजपणे म्हणाली, "घासाघिस करणं माझा हक्क आहे, पण एकदा भाव झाल्यावर कोणाचे पैसे खाणं पाप आहे." शेठ थोडा गोंधळला आणि म्हणाला, "पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे दहा रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता? असे दहा वीस रुपये कित...

प्रामाणिकपणा

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥         *मूल्य-प्रामाणिकपणा*      जीवन अनमोल,मूल्य अमोल *--------------------------------*       वडापाव विकणारा राजू ट्रेनच्या मागे पळत होता. त्याच्या छोट्या हातात वडापाव घट्ट पकडलेला होता.ट्रेन सुटताच त्याने ट्रेनमधल्या एका माणसाला तो वडापाव विकला. दोघांचीही घाई झाली – एकाला पैसे द्यायची, दुसऱ्याला पैसे घ्यायची. राजू अजून ट्रेनच्या मागे पळत हात पुढे करत होता, तो माणूस दारात उभा राहून खिशातून पैशांचे पॉकेट काढत होता. गाडीने वेग घेतला, राजू मागे राहू लागला... क्षणभर त्या माणसाच्या मनात आले –"आता पैसे देऊन काय उपयोग… जाऊदे, नको द्यायला!" मनात थोडी कपटभावना आली. पण…पॉकेट परत खिशात ठेवताना चुकून मोबाईल आणि पॉकेट दोन्हीही खाली पडले! तो घाईघाईने पकडायला गेला, पण ट्रेन थोडी वेगाने पुढे गेल्याने शक्य झाले नाही. पॉकेट व मोबाईल ट्रॅकवर पडून राहिले. त्या माणसाचा जीव घाबरला- त्यात प्रवासाचे पैसे, खर्चाचे पैसे, तिकीट सगळं होतं.तो माणूस कोपऱ्यात जाऊन बसला, शरमेने आणि भीतीने डोळ्यात पाणी आले. शेजारी ठेवलेला वडापावसुद्धा खाण्याची त्...