जीव हळवा व्हावा
हा जीव खूप हळवा व्हावा
म्हणूनच हे सारे नाते असतात!
ते सणांच्या रित रिवांजा साठी
वर्षातून फक्त एकदाच येतात !
भाऊ रोज माझ्या घरी यावा
बहिणीला कधी नाही वाटलं !
पण आज त्याच्या आठवणीने
थेट तीने तीच माहेरच गाठलं !
तीन भावाला ओवाळताना मात्र
जवळून त्याला न्याहाळून पाहणं!
अन् माहेरात जरी राहत नसली
तरी भावाच्या काळजात रहाणं!
दुसरं काय असतं अधीक यापेक्षा
भावाच अन् बहिणीच गोड नात!
कितीही सुखात दुःखात नांदली
ते माहेर थोडंआठवणीतून जात!
जरी सणाला नाही भेटता आलं
कोणी का माहेर विसरून जातं!
माहेरच्या अंगणात खेळायल्या
चिमुकल्या पाऊल खुणांच नातं!
Comments
Post a Comment