Posts

Showing posts from May, 2026

बोगस पदव्या

चौकात एक दुकान उभं राहीलं.त्यावर पाटी होती इथं पदव्या विकत मिळतील.मग एक राजा तिथ गेला त्यानं स्वतःला सगळ्या पदव्या विकत घेतल्या.त्याच्याकडे सत्ता होती पैसा होता.मग तो त्या दुकानदाराला म्हणाला “अहो,माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी विकत द्या मला.लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे.”       दुकानदार हात जोडत म्हणाला, “माफ करा साहेब आम्ही घोड्यांना नाही गाढवाना पदव्या विकतो..”       त्याने दिलेलं उत्तर हे आजच्या शैक्षणिक अवस्थेला समर्पक उत्तर आहे.         आजपर्यंत ढगफुटीने खचलेला शेतकरी आता पेपरफुटीने घाबरून गेलाय.कारण बांधावर बसून अभ्यास करणाऱ्या त्याच्या लेकरांच्या स्वप्नांचा खून या व्यवस्थेने करायला सुरवात केलेली आहे.        इथला शेतकरी,मोलमजुर आणि मध्यमवर्गीय माणूस आपल्या मुलाला डॉक्टर बनवू शकणार नाही हे लाज आणू पाहणारं सत्य उघड झाल्यानंतरही चौकात जमाव होत नाही याचा अर्थ आपण संपलो आहोत असाच आहे.          कारण 20 मार्काला अभ्यासक्रमात असणाऱ्या नागरिकशास्त्र शिकलेल्या फालतू मेंढरांची गर्दी म्हणजे तुम्ही आ...

ह्रदयस्पर्श

"मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या... आज माझा 'दुसरा वाढदिवस' आहे!" सिग्नलवरच्या पोराचे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या करोडपती आईने थेट रस्त्यावरच हंबरडा फोडला! पुण्यातील चांदणी चौकातील सिग्नलवर दुपारच्या कडक उन्हात गाड्यांची रांग लागली होती. एका आलिशान 'ऑडी' (Audi) कारमध्ये ३५ वर्षांच्या 'अनुराधा' डोळ्यांवर गॉगल लावून बसल्या होत्या. पण त्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडत होते. आज '१५ एप्रिल'. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अनुराधा यांचा ७ वर्षांचा एकुलता एक मुलगा, 'अंश' एका भयंकर अपघातात त्यांना सोडून गेला होता. अंश 'ब्रेन डेड' (Brain Dead) झाला होता, आणि एका धाडसी निर्णयापोटी अनुराधा आणि त्यांच्या पतीने अंशचे सर्व अवयव (Organs) दान केले होते. आज अंशचा स्मृतिदिन होता. अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथश्रमात देणगी देऊन घरी परतत होत्या. तो सिग्नलवरचा प्रसंग आणि एक १० वर्षांचा मुलगा: सिग्नल लाल झाला. उन्हाच्या झळा लागत होत्या. तेवढ्यात एक १०-११ वर्षांचा, घामाने डबडबलेला पण अत्यंत गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या ...

कविता

✨✨✨✨✨✨*शाळा आमची शाळा* ********************************** *शाळा आमची शाळा ही माय माऊली।* *हिने दिली आम्हा ज्ञानाची सावली।।धृ।।*      *शाळेमध्ये आम्ही आनंदाने जातो।*      *दिलेला अभ्यास नियमित करतो।* *संस्कारांची पुंजी इथेच मिळाली।।१।।*      *सुजान नागरिक आम्ही बनू या।*      *दीन-दलितांची सेवा करू या।* *देशप्रेमाची ज्योत इथेच पेटली।।२।।*      *आधुनिक ज्ञान घेऊन आम्ही।*      *बलशाली राष्ट्र घडवू आम्ही।* *मानवतेची पताका इथेच रोवली।।३।।* *--------------------------------------*                           *लेखन*       श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे कळस ता. पारनेर जि. अ . नगर                      मो. 7588025491