भेट

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
 एक छोटी कविता खास मित्रांसाठी.
*---------------------------------------*
                 *स्नेहमेळा* 
👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼👨🏻‍🍼🧑‍🍼
          *भेटण्यासाठी*
*मन माझे झालेय बर आतुर*
*कसा असेल माझा सखा चतुर*

         *भेटण्यासाठी*
*शब्द माझे येतात ओठी*
*पुन्हा होतील मित्रांच्या गाठी*

         *भेटण्यासाठी*
*डोळे कासावीस आहेत माझे* 
*रूप न्याहळील मित्रा मी तुझे*

         *भेटण्यासाठी* 
*पाय  माझे  उरकतील वाट*
*आता होईल मित्रांची गाठ*

         *भेटण्यासाठी*
*कर्ण माझे फार अधीर होई*
*मित्रांचे गोड शब्द कानी येई* 

        *भेटण्यासाठी*
*हृदय माझे ऋण कंप पावते*
*मैत्रीचे नाते अधिक दृढ होते*

         *भेटण्यासाठी*
*मी उभा असेल दोन्ही कर जोडुनी*
*तुझ्या प्रतीक्षेत अश्रू येतील नयनी*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*---------------------------------------*
*जमेल बर स्नेहीमित्रांचा महामेळा l*
*जुन्या आठवणींना देतील उजाळा ll*
*---------------------------------------*
      
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ