हेड मास्तर
सून आरशात लिपस्टिक लावत म्हणाली –
“आई, आज तुम्ही स्वतःच्या जेवणाचे बघा बरं का... आम्ही दोघं एका पार्टीला जाणार आहोत...!!”
आई शांतपणे म्हणाली –
“बाळा, मला गॅस पेटवायलाही जमत नाही गं..!!”
मग मुलगा म्हणाला –
“आई, आज मंदिरात भंडारा आहे. तू तिथे जा, स्वयंपाकाची काहीच चिंता नाही...!!”
आई शांतपणे चप्पल घालून मंदिराच्या दिशेने निघाली...
हे सगळं दहा वर्षांचा रोहन कान देऊन ऐकत होता.
तो वडिलांबरोबर गाडीत बसला आणि म्हणाला –
“पप्पा, मी मोठा माणूस झालो की माझं घर नक्की मंदिराशेजारीच बांधेन...!!”
“कारण, कधी मी आणि माझी बायको पार्टीला गेलो तर तुम्हालाही जेवायला दूरवर मंदिरात भंडाऱ्याला जावं लागू नये... मला नको आहे की तुम्ही त्रास करून दूरवर जाल...!!”
हे ऐकून मुलगा आणि सुन दोघांचेही डोळे पाणावले.
त्यांनी लगेच गाडी वळवली आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला.
“आईच्या पायाशी बसून माफी मागायची,” असा दोघांचा निश्चय झाला.
गाडी पार्क करून जेव्हा ते दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोहोचले,
तेव्हा आतून गाण्यांच्या तालावर हशा आणि गप्पांचा आवाज येत होता.
मुलाने बेल वाजवली.
आतून आवाज आला –
“शारदाजी, दार उघडा... वाटतंय आज पिझ्झा लवकरच आला...!!”
दार उघडलं पाहिलं तर समोर शेजारच्या शर्मा काकू उभ्या होत्या.
आणि त्यांच्या मागे... स्वतःची आई –
जीन्स आणि पिवळा टॉप घालून, मित्र-मैत्रिणींसोबत जोरदार पार्टी करत होती!
आठ-दहा स्त्रिया-पुरुष हातात थंड पेप्सीचे ग्लास घेऊन गाणी म्हणत होते,
आणि “पाणी, पाणी...” या गाण्यावर सगळ्यांचे पाय थिरकत होते.
मुलगा आणि सूनबाई क्षणभर दचकलं, पण आई हसून म्हणाली –
“काय झालं रे? पार्टी कॅन्सल झाली का? काही हरकत नाही...
या, आमच्या पार्टीत सामील व्हा... मी अजून तीन पिझ्झा ऑर्डर करते...!!”
– आजचे ज्येष्ठ नागरिक असहाय्य किंवा कमकुवत नाहीत.
तुम्ही ज्या शाळेत शिकताय, त्याचे हेडमास्टर ते कधी काळी होते...!!
Comments
Post a Comment