अंबिका माता
*कुलस्वामिनी अंबिका माता* देविभोयरे
भगवान शंकराची उमा महेश्वरी
नाम तुझे अष्टभुजा अंबाबाई
सर्व ब्रम्हांडाची तु पालनकर्ती
भक्तांच्या हाकेला पावसी लवलाही
पाटणच्या नारायणाने घडविली
सोनपितळी धातुंची तुझी मुर्ती
दक्षिणाभिमुख तुला स्थापिली
जगदंबा तुझी जगभर किर्ती
पंडित शंकर देवराव क्षिरसागर नामे
उच्चकुळी ब्राम्हण घरची तु देवता
त्यांनीच मनोभावे केली स्थापना
अवतार महाकालीचा जीता जागता
नाकी नथ रत्नजडीत सुवर्णाची
हिरवी साडी परिधान करून
मांगल्ल्याचे विलोभनीय रूप
भक्त पाहती डोळे भरून
हाती त्रिशुल, शंख, चक्र आयुधे
शिरी मुकुट भाळी कुंकवाचा टिळा
पायी पैंजण,तोडे, जोडवी,मासोळ्या
गळा पुतळ्या,मंगळसुत्र, मोहनमाळा
प्राण्यांतील सिंह वाहन तुझे
उभा मंदिराच्या प्रवेशव्दारी
येताना प्रथम त्याचेच दर्शन
भक्तिभावाने घेतात सारी
रोज पहाटे अन् संध्याकाळी
देविची होते नेमाने आरती
तिच्या नित्य नित्य दर्शनाने
सर्व इडा, पिडा व दुःखे सरती
नवरात्रातील नऊ दिवसात
होतो साजरा नवरात्र सोहळा
पाहुन भक्तांचे फिटते पारणे
याच देही अन् याच डोळा
हे जगदंबा महाकाली माता
तव चरणावरी ठेवितो माथा
असु दे भक्तांवर कृपेची छाया
किती वर्णु तुझी अगाध गाथा
कवि - एकनाथ बबन औटी ,
सेवानिवृत्त एस् . टी . वाहक ,
वडझिरे ता .पारनेर जि . अहिल्यानगर .
Comments
Post a Comment