निरोपाचा क्षण
निरोपाचा क्षण आज आदर्श जि.प.प्रा.शाळा निर्मल ग्राम कळस शाळेतील आजचा निरोपाचा दिवस.....
आपल्या मागील सात ते आठ वर्षातील कालखंडाकडे हळूच मागे वळून पाहताना.. आपण लावलेली झाडे आपले घडलेले विद्यार्थी या सर्वांकडे पाहताना मनात हुरहूर दाटून येईल...कंठ दाटून येतो,मुलांच्या नजरेला नजर भिडवताना अश्रू अनावर होतात....
काहीच फरक पडणार नाही,असे म्हणताना खूप काही फरक शिल्लक ठेवून शाळेचा निरोप घेताना मनामध्ये आठवणींचे वादळ उठते शब्दभेदी बाण विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागतील, सर्वांना हा क्षण सामोरा असताना नकळत डोळ्यांच्या कडा पानवतील... थोडा वेळ मन स्तब्ध राहिले...
...... पुन्हा एकदा म्हणेल जन पळभर म्हणतील हाय हाय...
मी जाता राहील काय?
पण नक्कीच प्रत्येकाच्या आठवणी त्या त्या शाळेत जपून राहतील.. त्याच्यासाठी, इतरांसाठी...
काही व्यक्त होतील काही व्यक्तही होणार नाहीत ... पण आपले कार्य नक्कीच प्रेरणा देत राहील...
नवे नक्कीच मिळतील...
म्हणुन जुने अडगळीत पडतील असे नाही....
पण वेळ अशी असते की सर्व गोष्टीवर मात करण्यास प्रत्येकास प्रवृत्त करते, नव्हे हाच निसर्ग नियम आहे....जुनी शाळा,नवीन शाळा,संपूर्ण गावात भरलेली शाळा,आज देखण्या वास्तुतील शाळा,प्रशस्त मैदान ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जात नाहीत.सर्व लाडके विद्यार्थी,त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतांना झालेली दमछाक आठवते,त्यांना घडवताना बोललेले वाईट शब्द,थोडी फार दिलेली शिक्षा सगळ्या गोष्टी आठवताना डोळ्यात अश्रू तरळतात...................गावातील ग्रामस्थांचा शाळा बांधकाम पूर्ण होण्,यासाठी चा त्याग,पदाधिकारी यांची धावपळ,ग्रामस्थांचे सहकार्य,पालकांचे सहकार्य,अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन,शाबासकी, पालक,माता- पालक,वडीलधारी माणसे यांचा शिक्षणातील सहभाग,ग्रामपंचायत, विविध सेवा सहकारी सोसायटी,जनसेवा मंडळ,भैरवनाथ मंडळ,गावातील विविध मंडळे,महिला मंडळे, माजी विदयार्थी यांचे शाळेसाठीचे योगदान साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात.वार्षिक स्नेह संमेलन,शैक्षणिक सहल,विज्ञान प्रदर्शन,खोडद येथील विज्ञान प्रदर्शन,विविध सांस्कृतिक स्पर्धा,क्रीडा स्पर्धा केंद्र पातळी,तालुका पातळी,जिल्हा पातळी या साऱ्या मध्ये माझे विद्यार्थी यशस्वी व्हावे म्हणून मार्गदर्शन करतांना होणारी तळमळ....
या साऱ्या गोष्टी नजरे आड जात नाहीत.मुलांसोबत असणारे नाते,त्यांच्यात रममान होताना होणारा आंनद या गोष्टी कधीही विस्मरणात जाणार नाहीत, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक समिती,माता पालक समिती,ग्रामस्थ यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही,शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षकांनी केलेले सहकार्य,विदयार्थ्यान्ची सहकार्य वृत्ती,दिवेकर मावशींनी बनविलेला पोषण आहार,या गोष्टी कधीनी विसरता येणार नाहीत.
सर्व आठवणींना मार्ग मोकळा करून देताना........माझा गाव,माझी शाळा,माझे विदयार्थी. हॆ ब्रीद मनाशी व्रत घेऊन काम करताना मिळालेला आनंद.....आणि वयाच्या सहाव्या वर्षांपासून वयाच्या अठ्ठावन वर्षां पर्यंत शाळेची पायरी चढण्याचं भाग्य लाभलेला शिक्षकी पेशा आणि त्या पेशाशी असणारा,जपलेला प्रामाणिक पणा.......................या भाग्यावर
पुन्हा नव्या ठिकाणी आपल्या कार्याचे नवे रोप लावून त्याचा वृक्ष करण्यास सज्ज होऊ या.......
सर्वांचा जड अंतःकरणाने निरोप घेवू या🌹🌹🌸🌺 श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे (विज्ञान पदवीधर) नवीन शाळा,देवीभोयरे ता.पारनेर जि.अहिल्यानगर
Comments
Post a Comment