✨माझी लाडकी आजी ✨

माझी आजी (कविता )

माझी होती लाडकी आजी, माझी नि फक्त माझी ||धृ ||
आजी पावसात भिजली, उन्हात राबली.
राबराब राबली, पण कुणावर कधी नाही रागावली.
साधी सोज्वळ भोळी आजी.
माझी होती लाडकी आजी ||1||
तिच्या सारखीच तिच, सरळ मार्गानं चालणारी.
कधीही न रुसणारी, कायम हसणारी.
सदा न कदा कामात गुंतणारी.
माझी होती लाडकी आजी ||2||
आजी सरळ चालली, सरळ वागली.
दुसऱ्याच्या वाटेतलं काटे उचलत चालली.
सदा देत राहणे, वसा ती देत राहिली.
माझी होती लाडकी आजी ||3||
आल्यागेल्या जवळ गुणगान,ती माझंच गाई. नातू माझा असा, नातू माझा तसा, सगळ्यांना सांगत राही.
आई तुझ्याच आठवणीने आज डोळ्यात पाणी येई.
माझी होती लाडकी आजी ||4||
आजी घर आमचे सुनेसूने, तू आज नाही, आठवण येते मनोमनी अश्रू आवरत नाही.
सारे जग जरी फिरलो तरी,
 आजी तू दिसणार नाही. माझी होती लाडकी आजी ||5||
आजी वसा तुझा आम्ही जपू मनोमनी, येणाऱ्या-जाणाऱ्याला घास घालुनी.
देतो हीच भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या चरणी. माझी होती लाडकी आजी ||6||

श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे.
जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर
 मोबाईल 7588025491

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ