भाग्यवान मी शिक्षक झालो (कविता )
कविता
भाग्यवान मी शिक्षक झालो.
उमलत्या चैतन्याशी रोज नवं चैतन्य येई
भाग्यवान मी शिक्षक झालो.
लागलो सेवेला मी सत्यान्नव साली,
दूर होते गाव नी घर.
नाही खेद वाटला कधी,
कधी झाला माझा गाव नी माझी शाळा.
भाग्यवान मी शिक्षक झालो.
गोरगरीब जनतेची लेकरं,
व्हावी शिकून हुशार.
हाच उदार दृष्टीकोन,
डोळ्यासमोर ठेवून.
काम केले मी निरंतर,
लेकरांचे प्रेम मी मिळवले अपार.
भाग्यवान मी शिक्षक झालो.
एकच ध्यास धरला मनीची ,
जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,
सांगून गेले साने गुरुजी,
मी तर वसा घेतला निरंतर,
आहे सेवा तोवरी राहीन तत्पर. भाग्यवान मी शिक्षक झालो.
स्वरचित कविता
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अ. नगर 7588025491
धन्यवाद 🙏🏻
Comments
Post a Comment