हरवलेली माणसं
माणसात कुठे माणसे राहिले आता
लबाड दुनियेत सारेच वाहिले आता
अर्थ सोयीचा इथे हवा असे सर्वांना
वाट तिरकी धावणारे पाहिले आता
भरवशाचा सदा छळवाद तो ठरलेला
विश्वासाचे नाते कुठे राहिले आता
पहाटेस रान होते गाढ झोपलेले
लुटताना त्यांस लांडगे पाहिले आता
डंख जातींचे किती टोचती विषारी
नाना रंगी विंचवांना साहिले आता
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे . जि.प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर
Comments
Post a Comment