19 उंटाची गोष्ट

*१९ उंटांची गोष्ट*

*एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.*

*एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.*

*त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.*

*ज्यामध्ये असे लिहिले होते की..*

 *माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.*

 *अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.*

 *१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.* 

*त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.* 

*त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?*

 *सगळेच खूप गोंधळले होते.* 

*तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.*

*तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.*

*समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.*

*मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.*

 *प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.*

*तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.*

*तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.*

*असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.*

 *आता एकूण उंट १९+१=२० झाले.*

 *२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.*

*उरले १० उंट.*
 *२० उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.*
 
 *२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.*
*असे एकूण १०+५+४=१९ होतात.*

*त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.*

 *अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.* 

 *त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.*
 *५-ज्ञानेंद्रिये.*
 *(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)*

 *५ कर्मेद्रिंये.*
 *(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार)*

 *५ पंचप्राण.*
*(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )*

 *आणि...*

*४-अंतःकरण चतुष्टय.*
 *(मन, बुद्धी, चित्त, अहंकार)*

 *असे एकूण १९ उंट आहेत.*

*माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.*

*आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  "मित्र" रुपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "मित्र" रूपी उंट सोबत ठेवा.*

*जोपर्यंत मित्र रुपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.*🙏

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ