मोकळं होऊ या

होऊ या थोडं मोकळं 
चला आज लेफ्ट होऊ 
नको रोज कटकट 
आनंदात शिफ्ट होऊ 

 रोज ते नवे फतवे 
 नको आता पुन्हा पुन्हा 
 शिकवणं गेले मागे 
  काय आमचा रे गुन्हा 

 बस झालं अवांतर 
 आम्हा शाळेत जाऊ द्या 
 वाट पाहती लेकरं 
 जरा वर्गात राहू द्या 

 दिले खूप सारे ॲप
 उपयोग काय झाला 
 शोध तरी कोण घेतो 
 शिक्षणाचा घात झाला

मुलं म्हणती गुरुजी 
ड्रेस हरवला कुठं 
आले उशिरा कापडं 
आणि तेही झालं थिटं

आहाराच्या नावाखाली 
 पोषणाचा पोरखेळ 
 नोंदी रोजच्या लिहिण्या
 खूप जातो यात वेळ 

झाक पाक येते गाडी 
  रोज जाते दारातून 
 पोरं जाती बावरून 
  पैसा आणावा कुठून
 
माझी शाळा माझी शाळा 
आता संपली वाटतं 
तिथे खाजगी दुकान 
सध्या जोरात थाटतं

 शिक्षणाला वाचवू या
लढा मिळून देऊ या
हाती मशाल क्रांतीची 
जगी प्रकाश देऊ                                                श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे                              जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ