दसऱ्याचे सोने

🌳🌳🌳दसरा आला ,माझा पाला तोडुन मला उघडे बोडके करू नका.. माझी आर्त हाक ऐका!!🌳🌳🌳🌳. *आपटा पानांचा औषधी उपयोग*🌳🌳सोन्याला मोल नाही.आपाटा अनमोल आहे..सोने घ्या,सोन्यासारखे. सोने फेकु नका..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


माझे अनुभवात आपट्याच्या पानांचा उपयोग पुढील त्रासांसाठी आला आहे. म्हणून

लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो, फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् खराब. ह्या त्रासावर आपट्याच्या पानांचे पाणी उपयोगी पडण्याची शक्यता आहे.

ही पाने फक्त दसऱ्याला मिळतात. ती साठवून ठेवून रोज दोन पाने गरम पाण्यात टाकून गार झाले की थोडेथोडे पिऊन पहावे.
 मला पडजीभेला फायदा झाला. मी एक पान तोंडात तासभर धरून ठेवले होते.

*वेगळ्या पध्दतीने केलेले निरीक्षण*
मला पडलेले प्रश्न ? मिळालेली उत्तरे !
*आपट्याची पाने दसऱ्यालाच का? फक्त आपट्याचीच पाने कां? इतर पाने (तुळस, माका, बेलाची पाने) का नाही चालत*
*आपले पूर्वज अडाणी नक्कीच नव्हते! कारण काय असावे?*
ह्यासाठी मी माझ्या एका बॉडी सेंसेटिव्ह असलेल्या तरुण  मित्र श्री .... ...... यांच्यावर प्रयोग केले. ही पाने दुसऱ्याला देण्याची प्रथा आहे म्हणजे हताळली जातात म्हणजे स्पर्शाला महत्व दिले आहे. म्हणून मित्राला आपट्याचे पान बोटात धरून ठेवायला दिले. व काय वाटते विचारले. दोन मिनीटांत त्याने सांगितले मित्रा स्नायुंना एनर्जी मिळते आहे व ऑरामधे एनर्जी वाढली. ऑरा दाट झाला. पुढील ३०मिनीटांत त्याने सांगितले- हार्टचे मसल व घशावर काम करते, ह्या दिवसात (सबंध पावसाळ्याचे दिवसात) कमी झालेली एनर्जी भरून येत आहे .असे वाटत आहे.
नंतर त्याला पायाला दुखत होते तिथे आपटा पाने ओले करून उलगडून  रूमालाने बांधुन ठेवले. तासाभरात त्याने दुखणे कमी झाल्याचे सांगितले.
  दोन दिवसांनी एका गृहस्थाना खांद्याला दुखत होते. तेथे आपटा पाने ओले करून फडक्याने बांधले. व दिवसभर ठेवण्यास सांगितले. दुसरे दिवशी वेदना आता नाहीत असे म्हणाले.
आपट्याचे हे गुण असल्याचे पूर्वजांना माहिती असल्याने समाजाला सांगत बसण्या ऐवजी समाजाचे उपयोगासाठी  आपट्याची पाने देण्याची प्रथा सुरू केली असावी असे माझे मत झाले.
  दसऱ्याचे दुसरे दिवशी  ही पाने कचऱ्यात टाकण्या पेक्षा साठवून ठेऊन वर्षभरात वेदना कमी करण्यासाठी जरूर वापरून पहा.🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

🌳🌳🌳🌳🌳

हा लेख मी   गेल्या वर्षी दसऱ्याचे आधी व्हाट्सअप वर पाठवला होता. त्यानंतर लोकांनी आपट्याच्या पानाचा उपयोग करून मला अनुभव सांगितले ते पुढे देत आहे.
 एका आजी बाईंनी तो लेख दसऱ्याला वाचला आणि रात्री आपट्याची पाने पायाला गुडघ्याखालील बाजूला बांधून झोपल्या. कारण एक वर्षभर त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली दुखत होता. कुठल्याच औषधाने फरक पडत नव्हता. हैराण झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाय दुखतो आहे हे विसरून  गेल्या होत्या, असे त्यांनी मला  फोन करून सांगितले.

एका गृहस्थांची (वय ६०वर्षे) कंबर दुखत होती. त्यांनी आपट्याच्या पानाचा काढा करून,त्यात फडके ओले करून कमरेला बांधले. असेच सात दिवस केले. त्यांना वयाच्या ४० व्या सारखी कंबर वाटू लागली.

एका गृहस्थांनी घसा दुखत होता म्हणून आपट्याची पाने घशाला बांधून ठेवली. दुसर्‍या दिवशी त्यांना बराच फरक जाणवला.

माझ्या मित्राचे मुलाला (वय २०) १० दिवसापूर्वी ताप आला होता. ताप गेल्यावर भरपूर अशक्तपणा आला. त्याने प्रयोग म्हणून माझ्याकडे असलेल्या आपट्याच्या पानाचे चूर्ण घेतले. एक तासाभरात त्याला भरपूर एनर्जी  आली.

*७सप्टेंबर २०२३ चा मित्राचा अनुभव*
७तारखेच्या आधी तीन दिवस माझी कंबर दुखत होती. १० तारखेला माझ्या मुलाचा वाढदिवस म्हणून मला  पुण्याला जायचे होते. मी ८ ला सकाळी मोठ्या मुलाला म्हणालो की कंबर दुखते आहे .उद्या पुण्याला जाणे जमणार नाही. तो म्हणाला थांबा मी तुम्हाला आपट्याचे तेल लावून देतो. व लगेच त्याने लावून दिले. संध्याकाळ पर्यंत कंबर पूर्ण पणे दुखायची थांबली. ते पुण्याला  जाऊन आले.
तेल करणे - एक वाटी तीळाचे तेलात आपट्याची २५-३० पाने तळणे. गार झाले की गाळून घेऊन वापरणे.




*सुचना-*
*आपट्याची पाने खरखरीत असतात. मुलायम नसतात. आपटा पान ३ इंचापेक्षा लांब नसते*
*दसऱ्याला आपटा पाने खरेदी करतांना नीट पाहून पारखुन घ्यावीत आपाट्याचे नावाखाली सध्या सारखी दिसणारी दुसरी पाने विकली जातात.भेसळीचा जमाना आहे.*



माझे ऐकुन समक्ष अनुभव घ्या.. अनुभवाचे बोल...🙏🙏🙏🙏🙏🙏                       श्री दादाभाऊ बाळासाहेब  जि. प. प्रा. शाळा कळस ता. पारनेर जि. अहमदनगर 7588025491

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ