नेहमी विचार पूर्वक वागा

*नेहमी विचारपूर्वक वागा.*   

*कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो ते चाक ठीक करू लागला. त्यावेळी त्याच्याकडे  शस्त्र नव्हते. तेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब बाणाने कर्णाला मारण्याचा आदेश दिला. अर्जुनाने परमेश्वराच्या आदेशाचे पालन करून कर्णाला लक्ष्य केले आणि एकामागून एक बाण सोडले आणि कर्ण जमिनीवर पडला. मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, "हे परमेश्वरा, तुच आहेस का? तु दयाळू आहेस का? हा तुझा न्याय आहे का?- निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे?  सच्चिदानंदमय भगवान श्रीकृष्ण हसत हसत उत्तरले, "अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रव्यूहात नि:शस्त्र झाला होता, जेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्घृणपणे वध केला तेव्हा तुही त्यात होतास. तेव्हा तुझे ज्ञान कुठे होते कर्णा? हे कर्माचे फळ आहे. "हा आहे माझा न्याय."    विचारपूर्वक वागा. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल, त्यांचा अनादर केला असेल, कोणाच्या कमकुवत पणाचा फायदा घेतला असेल तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याच कर्माचं मी तुम्हाला प्रतिफळ देईल...*   
*‼️जय श्रीकृष्ण‼️*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ