कोजागिरी
*मंद आचेवर मनाचं दूध आटवायला ठेवावं.*
*नकोशा आठवणींचं पाणी मग वाफ होऊन जातंच. हळूहळू जमलेली संस्काराची साय विरघळू लागली की त्यात नात्यांची वेलची अन आपुलकीचं केशर घालावं. वात्सल्याची साखर गरजेपुरती घातली की मनाला ऋणानुबंधांचा छान रंग चढेल. मनभर पसरलेल्या विश्वासाला चांदणस्पर्श झाला की मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणून समजा.*
*कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा...!*🌝
💫💞💫💞💫
Comments
Post a Comment